223 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानाचं इमरजन्सी लॅंडिंग
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

Russia Ural Airline: पायलटच्या दक्षतेमुळे 223 प्रवाशांचं सुरक्षित लॅंडिंग - पाहा व्हीडिओ

रशियात मॉस्कोजवळ 223 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानाचं इमरजन्सी लॅंडिंग करण्यात आलं.

पक्ष्यांच्या थव्याची विमानाला धडक बसल्यानंतर मक्याच्या शेतात लॅंडिंग करण्याचा निर्णय पायलटनं घेतला.

यामुळे जवळपास 74 प्रवासी जखमी झाले आहेत, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

Ural Airlines Airbus 321 हे विमान सिमरपूलकडे चाललं होतं. पण, उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणांत पक्ष्यांच्या थव्याची विमानाला धडक बसली आणि यामुळे इंजिनात बिघाड झाली. यामुळे मग हे विमान मक्याच्या शेतात लॅंडिंग करण्याचा निर्णय पायलटनं घेतला.

आता पायलटच्या निर्णयाचं कौतुक होत आहे.

लोकांचा जीव वाचवला यामुळे हा पायलट 'हिरो' आहे, असं सरकारी प्रवक्त्यांनी म्हटलं आहे.

लवकरच या पायलटला पुरस्कारानं गौरवण्यात येईल, असंही त्यांनी म्हटलंय.

दरम्यान, आता लगेच हे विमान उड्डाण भरणार नाही. घटनेची अधिकृत चौकशी सुरू आहे, असं एअरलाइनने स्पष्ट केलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)